क्रीडा निदेशक अली बाकोदा, हाफीज मुस्ताक पटेल यांचे सर्वत्र कौतुक
गंगापूर, (प्रतिनिधी): समाजात प्रामाणिकपणा आणि माणुसकी अजूनही जिवंत असल्याचे प्रेरणादायी उदाहरण राजीव गांधी चौक येथे चिकनचे व्यवसाय करणारे हाफीज मुस्ताक पटेल आणि ढोरेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील क्रीडा निदेशक अली बाकोदा यांनी दाखवून दिले आहे.
गंगापूर शहरात रस्त्यावर सापडलेले ३ हजार ५०० रुपये त्यांनी प्रामाणिकपणे संबंधित शेतकऱ्याला परत करून समाजासमोर आदर्श निर्माण केला. मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा गव्हाणे हे शेतकरी दुपारी शेतीसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी गंगापूर येथे आले होते. खरेदी पूर्ण करून ते काकासाहेब वालतुरे यांच्या ऑटोमोबाईल्स दुकानासमोरून निघून गेले. याचवेळी त्यांच्या खिशातून नकळत ३ हजार ५०० रुपये रस्त्यावर पडले. दरम्यान, त्या ठिकाणाहून जात असताना ढोरेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील क्रीडा निदेशक अली बाकोदा यांच्या नजरेस हे पैसे पडले. त्यांनी तत्काळ पैसे उचलून परिसरातील नागरिकांकडे हे पैसे कोणाचे आहेत? अशी विचारणा केली.
मात्र, त्यावेळी संबंधित व्यक्ती आढळून आली नाही. यानंतर अली बाकोदा यांनी प्रामाणिकपणे चौकशी सुरू ठेवली. अखेर हे पैसे कृष्णा गव्हाणे यांचे असल्याचे समजताच त्यांनी ते त्यांच्या स्वाधीन केले. हरवलेले पैसे परत मिळाल्याने गव्हाणे यांनी अली बाकोदा यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले. त्याचप्रमाणे राजीव गांधी चौक येथे एका ठिकाणची दुकानात रात्रीचे १० आणि ११ च्या दरम्यान मध्ये एक ग्राहक चिकन खायला आलं खाल्ल्यानंतर त्याचा आयफोन टेबलवर विसरून गेला होता.
काही वेळानंतर दुकान मालिका हाफीज मुस्ताक पटेल यांनी तत्काळ एक लाख वीस हजार रुपये किमतीचा आयफोन उचलून परिसरातील नागरिकांकडे हे आयफोन कोणाचे आहेत? अशी विचारणा केली. मात्र, त्यावेळी संबंधित व्यक्ती आढळून आली नाही. यानंतर मुस्ताक पटेल यांनी प्रामाणिकपणे चौकशी सुरू ठेवली. अखेर हे एक लाख वीस हजार रुपये किमतीचा आयफोन पृथ्वीराज बत्तीसे यांचे असल्याचे समजताच त्यांनी ते त्यांच्या स्वाधीन केले. हरवलेले एक लाख वीस हजार रुपये किमतीचा आयफोन पृथ्वीराज बत्तीसे परत मिळाल्याने गव्हाणे यांनी अली बाकोदा यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले.
माणुसकी शिल्लक असल्याची प्रचिती :
या घटनेमुळे परिसरात हाफीज मुस्ताक पटेल आणि अली बाकोदा यांच्या प्रामाणिकपणाचे आणि माणुसकीचे सर्वत्र कौतुक होत आहे. आजच्या काळात अशा सकारात्मक घटना समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून, अजून माणुसकी शिल्लक आहे, याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.













